पालेभाज्या
*☆ काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.....*
१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.
३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.
४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.
५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.
६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.
७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.
८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.
१०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.
११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.
१२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.
१३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.
१४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.
१५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.
१६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्यांनी नियमित सॅलड खावे
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*
(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
उपाय
कोथींबीर घ्या बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.
=========================
कढीपत्ता चटणी ( Curry leaves Chutney)
*********************************
कढीपत्ता
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय
स्वयंपाक घरातले एक महाऔषध.
'कढीपत्ता' हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. की, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते.
कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.जंगलातला कढीपत्ता जास्त गडद
रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात...आणि झाड मोठे झाले कीत्याच्या बिया आजूबाजूला पडून, कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.
कढीपत्त्याचे 'आहार' आणि 'औषध' अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.
२) जुलाब लागले असता,
कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
'पोटातल्या वेदना' आणि 'जुलाबाचे वेग' वेगाने नियंत्रणात येतात.
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत
करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो,
त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ
मिसळून खावीत.
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे.
नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर,
कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण 'केमो' आणि 'रेडियो' थेरपी घेत असताना,
त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते.
अशा रुग्णांना दिवसातून तीन
वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून
खायला लावावीत.
रुग्णाला बराच आराम मिळतो.
१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर,
अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे 'अमृत' आहे.
कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर,
कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर,
मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत.
याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
...असा हा
'बहुगुणी' आणि 'आरोग्यसंपन्न'
कढीपत्ता आहारात नियमित ठेवा.
कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.
मात्र इतका बहुगुणी कढीपत्ता आपल्या रोजच्या खाण्यात कितीसा येतो? आपण पोहे, उपमा,आमटी, भाजीत असा किती वापरतो? चार-सहा पाने फक्त,! तेही ऐनवेळी हाताशी असला तर ठीक नाहीतर नसतोच. कारण आपण रोज काही कढीपत्ता आणत नाही. आठवड्यातून एकदा भाजीसोबत आणतो व तो दोन दिवसानी पाने गळून वांळून नाहीतर कुजून गेलेला असतो. तर जास्तीत - जास्त कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी मी आज कढीपत्याची 'ओली चटणी' केली आहे. 'कोरड्या चटणी'ची रेसिपी यापुर्वीच दिलेली आहे. ओल्या चटणीचे साहित्य व कृती 👇
साहित्य :-
* कढीपत्ता पाने एक मोठी वाटी
* चणाडाळ पाव वाटी
* उडीद डाळ मुठभर
* ओलं खोबरं २ चमचे
* चिंच सुपारी एवढी
* लाल सुक्या मिरच्या २
* जीरे लहान अर्धा चमचा
* मीठ चविनूसार
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा.
आता गँसवर कढई ठेवून चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी.
नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे,चिंच भाजून घ्यावे.
भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ व ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसरच ठेवावी.
आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग -जीरे व कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी.
अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा मधे मधे चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका हं ☺
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
=========================
👉 *आजार निर्मितीची कारणे* 👇
१. उशीरा झोपणे उशीरा उठणे.
२. दुपारी खुप वेळ झोपणे.
३. व्यायामाचा अभाव
४. मोकळ्या हवेत न फिरणे.
५. शरिराला जरा सुद्धा कोवळे ऊन लागू न देणे.
६. अतिरिक्त क्लोरिन युक्त पाणी पिणे.
७. हातगाडे, हाँटेलमधील व घरी वारंवार तेलकट तिखट पदार्थ खाणे.
८. शिळे अन्न खाणे.
९. व्यसने
१०. दुषित हवा.
११. दिवसभर एकाच जागेवर बसून बैठी कामे करणे.
१२. कामाचा अतिरिक्त ताण घेणे.
१३. गोगांटात किंवा प्रचंड आवाजात राहणे.(ध्वनीप्रदुषण)
१४. शारीरीक स्वच्छतेचा अभाव
१५. घरातील व परिसरातील अस्वच्छता
१६. डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानेच मेडीकल मधील गोळ्या खाणे.
१७. शांततेने न जेवणे.
१८. उभे राहुन पाणी पिणे किँवा पदार्थ खाणे.
१९. बेकरिचे पदार्थ खाणे.
२०. सतत Non veg खाणे.
२१. प्लास्टीक पिशवतील विविध पदार्थ खाणे.
२२. कोल्ड्रिंक्स पिणे.
२३. दात न घासणे.
२४. एकच ड्रेस, रुमाल इ. कपडे एका दिवसापेक्षा जास्त वापरणे.
२५. आहारात फळांचा समावेश नसणे.
२६. दुध न पिणे.
२७. अँल्युमिनीयमच्या भांड्यातील स्वयंपाक खाणे.
२८. फ्रिजमधील पाणी पिणे.
२९. antibiotics औषधे वारंवार खाणे.
३०. आहारात मीठ भरपुर खाणे.
इत्यादी
वरिल गोष्टी टाळल्यातर आपले आयुष्य खरोखर निरोगी बनेल
🌹 *आरोग्य हीच संपत्ती*💪🌹
Comments
Post a Comment